राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र व ब्रह्माकुमारीज् यांच्यातफे मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग कार्यशाळा

तुमसर (दि. 20 ) राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणिब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळेत उपस्थितांनी मेडिटेशनद्वारे गहनशांतीचा अनुभव करुन दैनंदिन जीवनातील धावपळीपासून काही क्षण का असेना तणावमुक्तिचा अनुभव घेतला. राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मेडिटेशन वर्कशॉप फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स या उपक्रमातर्गत शासकीय अधिकारी व कर्मचा­यांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

        या उपक्रमांतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचा­यांचे मानसिक बळ वाढविणे हे प्रमुख उद्देश होता.त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले गेले. त्याचच एक भाग म्हणून स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र आणि शासनाच्या वैद्यकिय विभागामार्फत सदरहू कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जगात विविध क्षेत्रात चाललेली गळेकापू स्पर्धा, एकमेकांशी अनावश्यक होणारी तुलना, कुरघोडी, चढाओढ यामुळे निर्माण होणारी नकारात्मक ही मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक असुन सुदृढ मानसिक स्वास्थ्याची गुरूकिल्ली राजयोग ध्यानाभ्यास होय. आजच्या
गतीमान आणि धावपळीच्या, स्पर्धेच्या जीवनात ताण-तणाव व मानसिक समस्यां भेडसावित असतांना प्रत्येकास मानसिक स्वास्थ्य असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत मेडिटेशन, धानाभ्यास हे मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वाचे ठरणारे आहेत असा सूर राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळेत उपस्थितांनी काढला.

ब्रह्माकुमारी प्रतिभा दीदी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने  मेडिटेशनद्वारे गहनशांतीचा अनुभव करुन दिला.

    ज्यायोगे दैनंदिन जीवनातीलधावपळीपासून काही क्षण का असेना तणावमुक्तिचा अनुभव घेतला. प्रशिक्षणामुळे आपण देत असलेल्या सेवेत अधिक निपुणता येते आणि अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा जनतेस दिली जाऊ शकते या उद्देशाने आरोग्यसेवेत असणा­या आपल्या अधिकारी आणि कर्मचा­यांना शारीरिक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्याचे प्रशिक्षण मिळावे आणि मानसिक स्वास्थ्याचे त्यांनी प्रबोधन करावे या उद्देशाने कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेसाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आयुष अधिकारी, सहा. आयुष अधिकारी, ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागाचे पदाधिकारी यांनी सहकार्यकेले. डॉ. उमेश तागडे, सहा. संचालक (आयुष), राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागाचे डॉ. सचिन परब, मुंबई यांचे सदरहू कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन लाभले.

      व्यासपीठावर ब्र.कु शक्ति दीदी ब्रह्माकुमारी प्रतिभा दीदी ,डॉ महबुब कुरैशी (तालुका आरोग्य अधिकारी ) रोशनिताई नारनवरे (पंचायत समिती सभापति ) डॉ शान्तिदास लुंगे (आरोग्य अधिकारी ) डॉ राहंगडाले देव्हडी ,चेतना डोये ,मीरा भट (समाज सेविका )होत्या.